Bollywood
Celebs
Tollywood
Hollywood
Movies
TV Shows
Web Series
Music
OTT

अग्गंबाई सासूबाई 23 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: प्रज्ञाने गैरसमज निर्माण केले

Manjiri Shete . Nov 25, 2019 .

अग्गंबाई सासूबाईमध्ये, प्रज्ञाने अभिजीसाठी आणलेल्या आसावरीच्या भेटवस्तूची अदलाबदल केली.

अग्गंबाई सासूबाई मालिकेतील मागच्या भागात अभिजीत राजे आणि आसावरी आईस्क्रीम खायला जातात. परत येताना, आसावरीला एकामागोमाग एक शिंका येतात आणि म्हणून आजारी पाडण्याआधी अभिजीत तिला घरी घेऊन जाण्याचे ठरवते. आता हे त्यांना माहित नाही कि प्रज्ञा रेस्टॉरंटजवळ लपून लपून बसली आहे. दरम्यान घरी, सोहमला शुभ्राला अभिजीतच्या रेस्टॉरंटमध्ये आईस्क्रीमसाठी घेऊन जायचे आहे. तसेच त्याला तिला अभिजीतची गर्ल्फ्रेन्ड देखील दाखवायची आहे. ते दोघेही रेस्टॉरंटमध्ये पोहोचतात. पण अभिजीत तिथे नसून त्याची दुचाकी मात्र बाहेर पार्क केलेली आहे. शुभ्रा सोहमला विचलित करते आणि ते तेथून निघून जातात.

अग्गंबाई सासूबाई मालिकेचा भाग पाहा:

आसावरीच्या वाढदिवशी, सकाळ-सकाळी ऐकू येणाऱ्या अभिजीतच्या वाढदिवसाच्या शुभेच्छानी आसावरी उठली. आवाज एका प्रोजेक्टरद्वारे येत आहे जो शुभ्राने आदल्या रात्री गुपचूप स्थापित केला होता. आसावरी आश्चर्यचकित आणि आनंदी आहे. शुभ्रा आत येऊन तिला मिठी मारते. नंतर, आसावरी आपल्या कुटुंबासमवेत असल्याने श्री आणि श्रीमती कारखानीस तिच्या घरी येतात. त्यांच्यामागे साडी आणि विग परिधान केलेली प्रज्ञा आहे. ती तिच्या सासू-बाबांकडे माफी मागण्यास सुरवात करते.

सासू आणि बाबा तिला माफ करण्यास तयार नाहीत. तथापि, प्रज्ञा म्हणते की, श्री आणि श्रीमती कारखानीस आसावरीच्या घरी राहत असताना ती घरी एकटीच काम करत होती. नंतर, आसावरी शुभ्राला अभिजीतसाठी तिने घेतलेली भेटवस्तू दाखवते. हे एक असे घड्याळ आहे जे अभिजीतला नक्की आवडेल, अशी आशा आसावरीला आहे. जेव्हा ती अभिजीतच्या रेस्टॉरंटमध्ये जाते तेव्हा तो एका पत्रकार परिषदेत व्यस्त असतो. या दरम्यान, आसावरी आपली भेटवस्तू इतरभेटवस्तूंबरोबरच ठेवते. दुर्दैवाने, प्रज्ञा तिथे येते आणि आसावारीच्या भेटवस्तूंची अदलाबदल करते. अभिजीतने ह्या भेटवस्तूला बघून आसावरीला नापसंत करायला सुरुवात करावी अशी तिची इच्छा आहे.

आपणास असे वाटते की आगामी भागात काय होईल? आम्हाला खाली टिप्पण्यांमध्ये आपले विचार कळवा.

अधिक मनोरंजनासाठी, मराठी सुपरहिट चित्रपट कान्हा विनामूल्य पाहा फक्त ZEE5 वर.

Featured Videos